जनतेच्या पाठिंब्यामुळे मतदारसंघाचा कायापालट करणे शक्य - आ. विश्वजीत कदम, आमणापूर व विठ्ठलवाडी येथे प्रचार दौरा
पलूस प्रतिनिधी :पलूस-कडेगाव मतदारसंघात जनतेच्या पाठिंब्यामुळे कायापालट करणे शक्य झाले आहे. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून पलूस-कडेगांवचे नाव जगाच्या नकाशावर झळकावण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.डॉ.कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमणापूर बोरजाईनगर व विठ्ठलवाडी या गावांमध्ये दौरा करून उगळेवाडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पलूस-कडेगाव मतदारसंघात डॉ. पतंगराव कदम यांनी भक्कम कामगिरी केली आहे. यामध्ये स्व. प्रा रामभाऊ उगळे यांनी त्यांना समर्थपणे साथ दिली.त्यांच्या पश्चात सर्वांगीण विकासासाठी विविध योजना मी राबविल्या. लागेल ती मदत माझ्या माणसांसाठी मी करतो. भविष्यातही मदत आणि सहकार्य करण्यासाठी कमी पडणार नाही. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ देणारे कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे. अन् त्यामुळेच मतदारसंघात भविष्यातील विकास योजनांची रूपरेषा कशी असावी याचा अभ्यासही मी करतोय. विकासकामांना अधिक गती देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.यावेळी आमणापूर गावात डॅा.कदम यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, माजी सरपंच विश्वनाथ सुर्यवंशी, मोहन घाडगे, अशोक काटे, विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे, माधव राडे, प्रमोद जाधव, राजाराम राडे, संदीप राडे, रणजित भोसले, संजय आवटे, धनाजी कदम सदाशिव कदम, मधुकर शिंदे, विलास राडे संजय राडे, मानिक कदम, पांडुरंग पाटील, प्रफुल्ल पाटील, जगन्नाथ पाटील, राजाराम पाटील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य , काँग्रेस मविआचे कार्यकर्ते ग्रामस्थ महिला तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.