हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पलूस येथे अभिवादन
पलूस प्रतिनिधी:युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पलूस येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पलूस येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन श्री वैभवरावजी पुदाले, क्रांती सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन श्री दिगंबर दादा पाटील, पलूस सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन श्री प्रकाश आप्पा पाटिल,पलूस नगर परिषद माजी नगराध्यक्ष श्री. परशुराम आप्पा शिंदे, श्रावण सोमवार कुस्ती कमिटी अध्यक्ष श्री भरत इनामदार, काँग्रेस पलूस तालुका कार्याध्यक्ष श्री गिरीश गोंदिल,भाजप शहर अध्यक्ष श्री रामानंद पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष श्री मारुती चव्हाण, मेजर श्री सुभाष शिंदे, श्री शामराव गोंदिल आदी च्या हस्ते हिंदु हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी गिरीष गोंदिल,रामानंद पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,युवासेना,वाहतूक सेना,शिव आरोग्य सेनचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्वागत युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी केले आभार सुधीर जाधव यांनी मानले.