Sanvad News भिलवडी सार्वजनिक वाचनालयात महिला वाचन कट्टा उत्साहात संपन्न

भिलवडी सार्वजनिक वाचनालयात महिला वाचन कट्टा उत्साहात संपन्न

 भिलवडी सार्वजनिक वाचनालयात महिला वाचन कट्टा उत्साहात संपन्न


भिलवडी प्रतिनिधी:

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महिला वाचन कट्टा क्रमांक पाच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ .रुपाली वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली व आणि सरोजिनी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचन कट्टा संपन्न झाला .

  रानकवी ना.धो.महानोर, कवी सुधांशु,आणि भिलवडीचे भूषण असलेले कविवर्य सुभाष कवडे यांच्या कविता असा विषय होता. वाचन कट्ट्याच्या सखीनी याचे उत्तम सादरीकरण केले. वाचन कट्ट्याचे संयोजन प्राजक्ता कुलकर्णी(कुंदा वहिनी)यांनी केले सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले.सुभाष कवडे यांच्या कविता संग्रहातील कवितेचे उत्तम सादरीकरण केले.

 त्यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांचे विशेष आभार मानले.उपस्थित वाचन कट्टा सखी,वाचनालयाचा सेवक वर्ग या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

To Top