Sanvad News डीपी जळला संग्राम चालतुय, पाणी सोडायला संग्राम चालतुय, एकदा मताला संग्राम चालवा : संग्राम देशमुख यांचे भावनिक आवाहन; कडेगांव तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा

डीपी जळला संग्राम चालतुय, पाणी सोडायला संग्राम चालतुय, एकदा मताला संग्राम चालवा : संग्राम देशमुख यांचे भावनिक आवाहन; कडेगांव तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा

 डीपी जळला संग्राम चालतुय, पाणी सोडायला संग्राम चालतुय, एकदा मताला संग्राम चालवा : संग्राम देशमुख यांचे भावनिक आवाहन; कडेगांव तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा


कडेगांव प्रतिनिधी : लोकांना कोणतीही अडचण आली की संग्रामची आठवण येते, डीपी जळला संग्राम चालतुय, पाणी सोडायला संग्राम चालतुय, एकदा मताला संग्राम चालवा , असे भावनिक आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. 

कडेगांव तालुक्यातील हणमंतवडीये येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. हणमंतवडीये,  कोतीज यासह विविध गावांमध्ये झंझावाती प्रचार दौरा झाला.

संग्राम देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक विकास कामे केले आहेत. यापुढेही विकास कामे आपण करणार आहोतच. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. पलूस आणि कडेगाव मतदार संघातील कोणत्याही गावात कोणाला कसलेही अडचण आली तर लोक मला थेट फोन करतात. कुणाला दवाखान्याची अडचण असते, कुणाचा शासकीय काम फाटलेला असतं, कुणाचा डीपी जळला संग्राम चालतो, पाटाला पाणी सोडायचा आहे संग्राम चालतो, तुमच्या सगळ्या कामांना जर संग्राम चालत असेल तर एक वेळ मताला पण संग्राम चालवा असे भावनिक आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.

यावेळी हणमंत वडीये ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय मोरे, माजी सरपंच संभाजी मोरे, संग्राम मोरे, मोहन मोरे, अंकुश कोकरे, शिवाजी मोरे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय कुंभार, अरूण कोकरे, उपसरपंच सतिश मोरे,  आत्माराम मोरे, ब्रह्मदेव मस्के, योगेंद्र संग्रामसिंह मोरे, सौ. स्मिता नितीन मोरे यांच्यासह विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.

To Top