Sanvad News विहापुरात काँग्रेसला खिंडार; कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विहापुरात काँग्रेसला खिंडार; कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 विहापुरात काँग्रेसला खिंडार; कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश


कडेगांव प्रतिनिधी : तालुक्यातील विहापूर येथे काँग्रेसला खिंडार पडले असून येथील नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. युवा नेते विश्वतेज देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. 

 विहापूर येथील विलास गणपती चव्हाण, रामचंद्र गणपती चव्हाण, विशाल किसन चव्हाण, शहाजी विलास चव्हाण, शिवाजी विलास चव्हाण, नथुराम गवळी, विश्वास रामचंद्र चव्हाण, पृथ्वीराज विश्वास चव्हाण, विकास किसन चव्हाण, समीर उत्तम बनसोडे, सुधीर उत्तम बनसोडे, सचिन उत्तम बनसोडे, दत्तात्रय जयसिंग नांगरे, विकास जयसिंग नांगरे, वाल्मिक दत्तू चव्हाण, विलास किसन बनसोडे, दयानंद गणपती बनसोडे, गौतम किसन बनसोडे, सचिन माने, दयानंद ईश्वर होलमुखे, विवेक विहापुरे, संजय विहापुरे , नितीन जयवंत बनसोडे, दामोदर किसन बनसोडे, अमोल बनसोडे, पप्पू वायरमन यांच्या सह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. मतदार संघाच्या विकासासाठी आपण प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. संग्राम देशमुख यांचे नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आधारवड असून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी विहापूर गावातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.



To Top