डॉ पतंगराव कदम यांचा वसा चालविणाऱ्या डॉ. विश्वजीत कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा - माजी आमदार मोहनराव कदम
भिलवडी प्रतिनिधी :राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम आहेत. आजपर्यंत त्यांना तुम्ही चांगली साथ दिली आहे. येथून पुढेही सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावा असे आवाहन विधानपरिषदेचे माजी आमदार वनश्री मोहनराव कदम यांनी केले.
माळवाडी ता.पलूस येथे आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ.पतंगराव कदम मंत्री असताना या भागाचा चांगला विकास झाला आहे. त्यांच्यामुळे आज सर्वत्र नंदनवन पाहायला मिळते. त्यांचा वसा आ.डॉ.विश्वजीत कदम चालवत आहेत. त्यांनी यापूर्वी माजी मंत्री म्हणून उत्तम काम केले आहे. महापूर आणि कोरोनातही ते सोबत होते. या सर्व कारणांमुळेच त्यांच्या पाठीशी तुम्ही सदैव सोबत राहावा. त्यांना चांगले मताधिक्य द्या अशी साद त्यांनी घातली.