Sanvad News पलूसला २४ बाय ७ पाणी योजना करणार; संग्राम देशमुख; स्वाभिमानी विकास आघाडीच्या मेळाव्यात पलूस मधून मताधिक्य देण्याचा निर्धार

पलूसला २४ बाय ७ पाणी योजना करणार; संग्राम देशमुख; स्वाभिमानी विकास आघाडीच्या मेळाव्यात पलूस मधून मताधिक्य देण्याचा निर्धार

  
पलूसला २४ बाय ७ पाणी योजना करणार; संग्राम देशमुख; स्वाभिमानी विकास आघाडीच्या मेळाव्यात पलूस मधून मताधिक्य देण्याचा निर्धार 

पलूस प्रतिनिधी : पोलीस शहरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात 24 बाय सात पाण्याची योजना आम्ही सुरू करू तसेच स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल त्यांनी सुचवलेली सर्व कामे केली जातील, असे आश्वासन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले. पलूस शहर स्वाभिमानी आघाडीच्या वतीने पाठिंबा दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी पलूस येथील संग्राम लॉन मध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार मेळावा झाला. या मेळाव्यात संग्राम देशमुख बोलत होते.  स्वाभिमानी आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूकडे यांनी संग्राम देशमुख यांना पलूस मधून मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. 

संग्राम देशमुख म्हणाले, पलूस शहर हे उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असून येथे एखादे मोठे मदर युनिट आणून आपल्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल असा प्रयत्न केला जाईल. पलूस शहरातल्या लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी 24x7 अशी स्वच्छ पाणी योजना योजना आपण कार्यान्वित करू. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला जाईल. येणाऱ्या पाच वर्षात पलूस शहराचे चित्र बदलेल असे खात्री मी आपणास देतो. अतिशय महत्त्वाच्या वेळी पलूस स्वाभिमानी आघाडीने दिलेला पाठिंबा आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. बापूसाहेब येशूकडे यांच्या स्वप्नातले पोलीस शहर घडविण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी आणि नागरिकांनाही भाजपला मतदान करण्यासाठी सांगावे. असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.


पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूगडे म्हणाले, ज्या काळात बापूसाहेब येसूगडे यांनी विकास कामे राबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मंडळींनी त्यांना विरोध केला त्यांच्यावर खोटे नाते आरोप केले. आणि आता ज्या मंडळींनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना पाठीशी घालण्याचे काम काँग्रेसचे आमदार करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संग्राम देशमुख यांना पलूस शहरातून आम्ही मताधिक्य दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूगडे, उमेश पाटील, सर्जेराव नलवडे, भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा पलूस शहराध्यक्ष रामनाथ पाटील, संजय येसूगडे, चंद्रदीप बुचडे, भावेश नलवडे, हणमंत कदम, सागर सुतार, विजय पाटील, प्रकाश पाटील, संजय बर्गे, अविनाश जाधव, नारायण निकम, रामानंद पाटील, अरुण ब्रह्मे, सुनील घोरपडे, विष्णू शिसाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 



To Top