बेलवडे येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
बेलवडे ता. कडेगाव येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांचे नेतृत्व मान्य करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
बेलवडे येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते विकास भार्गव सूर्यवंशी, कैलास बजरंग तवर, नथुराम गणपती सूर्यवंशी, विजय बबन पवार, आनंदा गणपती तवर यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रनिष्ठ विचारधारेवर विश्वास ठेवत संग्राम देशमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या वेळी कडेगाव तालुक्यातील बेलवडे गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.