Sanvad News विश्वजीत कदम यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला साथ द्या.. एक दिवस ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत दिसतील - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा विश्वास; पलूस येथे विक्रमी गर्दीने प्रचाराची सांगता

विश्वजीत कदम यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला साथ द्या.. एक दिवस ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत दिसतील - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा विश्वास; पलूस येथे विक्रमी गर्दीने प्रचाराची सांगता

विश्वजीत कदम यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला साथ द्या.. एक दिवस ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत दिसतील - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा विश्वास; पलूस येथे विक्रमी गर्दीने  प्रचाराची सांगता 

लूस प्रतिनिधी:माझे मित्र,लहान भाऊ डॉ.विश्वजीत कदम  पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातून दीड लाखावर मताधिक्याने विजय होतील. त्यांच्या विजयासाठी नाही तर त्यांच्या विरोधी उमेदवारचे  डिपॉझिट जप्त करायला मी एवढ्या लांबून आलोय.इथल्या उमेदवारच डिपॉझिट जप्त केल्याचा संदेश दिल्लीत नरेंद्र मोदींना द्यायचा आहे.विश्वजीत कदम यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला साथ द्या एक दिवस ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत दिसतील, याची जबाबदारी मी घेतो  असे आवाहन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले.काँग्रेस महविकास आघाडीचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ पलूस येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार मोहनराव कदम,डॉ.विश्वजीत कदम,खासदार विशाल पाटील,आमदार अनिल यादव,राष्ट्रवादीचे नेते शरद भाऊ लाड आदींसह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

यापुढे बोलताना मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले की,महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येऊन महायुती पाताळात जाईल.हे लक्षात आल्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दोन दिवस देश सोडून पर्यटनासाठी परदेशात गेलेत.एकनाथ शिंदे यांच्या सारख्या सामान्य माणसाला बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री बनविले.शरद पवारांनी स्वतःच्या मुली ऐवजी अजित पवारांना राजकारणात पुढे आणले.अशोक चव्हाण यांना गांधी परिवार व काँग्रेसने मुख्यमंत्री बनविले.पण या तिघे गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून मोदींचे गुलाम बनले.महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे.या भूमीतून गद्दारांचे उच्चाटन करण्यासाठी मी येथे आलोय.

महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचविण्याची ही वेळ..

महाराष्ट्राच्या विधानसभेची ही लढाई नसून दोन गुजराती व्यक्ती पासून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचविण्याची ही वेळ आहे.मोदी नेहमी म्हणतात आमचं सरकार डबल इंजिन सरकार आहे.मला वाटल हेलिकॉप्टर सारखं असेल म्हणजे एक बंद झालं की दुसरं चालू होईल.पण भाजपा मधील माझ्या मित्रांना विचारल्यावर समजल की हे आदानी प्रदानी सरकार आहे.म्हणजे आदानीच्या साथीनं देशाची लूट करीत हे सरकार चालवितात.


हेलिकॉप्टर मधून या आणि आमची वचनपूर्ती बघा..

तेलंगणा सरकारने जनतेस दिलेल्या वचनांची आम्ही वचनपूर्ती केली आहे.शंका वाटत असल्यास नरेंद्र मोदीं आणि त्यांच्या भक्तांनी समक्ष येऊन खात्री करावी.तेलंगणात तेवीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली,पन्नास हजार बेरोजगारांना रोजगार दिले.महिलांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली त्याचा एक कोटी दहा लाख महिला लाभ घेत आहेत.पाचशे रुपयात गॅस सिलेंडर घरपोच केला जातो.शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज,पन्नास लाख कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज दिली.माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला गांधी परिवाराने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसविल तेव्हा शेतकऱ्यांना न्याय देणं ही माझी जबाबदारी मानून मी काम करीत आहे.मोदीजी जितके दिवस खोटं बोलतील तितके दिवस मी खरे बोलत राहीन.

आजची तारीख,वार,वेळ लिहून ठेवा...

आजची तारीख,वार,वेळ लिहून ठेवा.एक ना एक दिवस विश्वजीत कदम महाराष्ट्र राज्य चालविण्याच्या महत्त्वपूर्ण खुर्चीत बसलेले आपणास दिसतील.तेवढी धमक त्यांच्यात आहे.गांधी परिवाराने स्वतः त्याग करून सर्वसामान्य लोकांना महत्वाच्या खुर्चीत बसविल आहे.तुम्ही विश्वजीत कदम यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून विरोधकाच डिपॉझिट जप्त जप्त करा.मी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या खुर्चीत बसविण्याची जबाबदारी घेतो.असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.  




To Top