Sanvad News नोकरीचे आमिष दाखवून वाम मार्गाने मतं घेण्याचा प्रयत्न करणारांना घरचा रस्ता दाखवा : संग्राम देशमुख; हणमंत वडीये, कोतीज येथे प्रचार दौरा

नोकरीचे आमिष दाखवून वाम मार्गाने मतं घेण्याचा प्रयत्न करणारांना घरचा रस्ता दाखवा : संग्राम देशमुख; हणमंत वडीये, कोतीज येथे प्रचार दौरा

   

नोकरीचे आमिष दाखवून वाम मार्गाने मतं घेण्याचा प्रयत्न करणारांना घरचा रस्ता दाखवा : संग्राम देशमुख; हणमंतवडीये, कोतीज येथे प्रचार दौरा

कडेगांव प्रतिनिधी : नोकरीचे आमिष दाखवून वाम मार्गाने मतं घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. हणमंत वडीये, कोतीज येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. गावोगावी संग्राम देशमुख यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

संग्राम देशमुख म्हणाले, निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच सात आठ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्यांच्या ऑर्डर देऊन तरूणांना अमिष दाखवून भुलविण्याचे प्रयोग चालू आहेत. लोकांच्या प्रती कसलीही आस्था नसलेली माणसे आता निवडणुकीत वाम मार्गाने मतं मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. अशा वाम मार्गाने अमिष दाखवणारांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले. 

हणमंतवडीये येथे माजी सरपंच संजय मोरे, माजी सरपंच संभाजी मोरे, संग्राम मोरे, मोहन मोरे, अंकुश कोकरे, शिवाजी मोरे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय कुंभार, अरूण कोकरे, उपसरपंच सतिश मोरे,  आत्माराम मोरे, ब्रह्मदेव मस्के, योगेंद्र संग्रामसिंह मोरे, सौ. स्मिता नितीन मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कोतीज येथे सचिन जगताप, कोतीज विकास सोसायटी चेअरमन विकास जगताप, भरत जगताप, विजय धनवडे, भाग्योदय पवार, संजय जगताप, आयुब मुजावर, इस्माईल मुजावर, सोसायटी संचालक बाबासो सावंत, सिकंदर मुजावर, ॲड संदीप जगताप उपस्थित होते.

To Top