Sanvad News केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा

   
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा

कडेगांव प्रतिनिधी : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. लॅबोरेटरी टेक्निशियन असोसिएशनच्या वतीने यावेळी पाठिंबा देण्यात आला. 

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माजी अध्यक्ष फार्मासिस्ट इंडियन असोसिएशनचे संचालक विजय पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कडेगांव तालुका अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, प्रशांत जमदाडे, समरजीत गायकवाड, भारत पालकर, विश्वास व्यास, महावीर माळी, भरत साळुंखे, सुहास पाटील, सागर वरूडे, कुंदन शहा, राहुल सुर्यवंशी, अभिजीत पाटील, मोहिन शेख, सागर गायकवाड, राजवर्धन लोखंडे, सौ. निलम बुचडे, सौ. रोहिणी वरूडे, सौ. स्वाती वरूडे, सौ. प्रभावती गायकवाड यांच्यासह कडेगांव तालुक्यातील केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.लॅबोरेटरी टेक्निशियन असोसिएशनचे ओंकार यादव, शरद चोरले, सचिन महाडिक, कैलास यादव, सौ. सुवर्णा साळुंखे, सौ. सोनाली पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सभासदांच्या तसेच सर्व ड्रगिस्ट यांच्या अडचणी सोडविण्यात येतील. राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. जिल्ह्यातील आवश्यक त्या सर्व ठिकाणी केमिस्ट भवनसाठी जागा उपलब्ध करून देऊ. शासनाच्या महत्वाच्या पदावर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाईल. 

विजय पाटील म्हणाले, संग्राम देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी अनेक केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविल्या आहेत. निवडणुकीत सर्वजण त्यांच्या सोबत राहणार आहोत. त्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत.

To Top