Sanvad News डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयानंतर धनगांव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष...

डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयानंतर धनगांव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष...

 डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयानंतर धनगांव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष...


भिलवडी प्रतिनिधी 

पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघ निवडणुकीत डॉ.विश्वजीत कदम यांचा  विजय झाल्याची वार्ता समजताच धनगांव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.गावातून मोटर सायकल रॅली काढून विजयाच्या घोषणा दिल्या. 

पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे यांनी डॉ.विश्वजीत कदम यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले असल्याचे सांगत अभिनंदन केले.धनगावचे सरपंच संदीप यादव यांनी योग्य सहकार्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले.

पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे, धनगावचे सरपंच संदीप यादव,उपसरपंच हणमंत यादव,माजी सरपंच वसंत काका पवार,सतपाल साळुंखे, अधिकराव पाटील,माणिक तावदर,विष्णू कुर्लेकर,प्रकाश यादव,श्रीपती माने,सुधीर साळुंखे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,कुशिनाथ यादव,अविनाश शेळके,दिलीप मोहिते,प्रशांत साळुंखे,रवींद्र साळुंखे,सुनील साळुंखे,सागर यादव,संभाजी साळुंखे,महेशबापू साळुंखे,सुधाकर रोकडे,रमेश केवळे,बाबसो मोटकट्टे,दिनकर साळुंखे,किसन बोडरे, संदीप मोटकट्टे आदी सहभागी झाले.



To Top