Sanvad News १२ ऑगस्टला भिलवडीत रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार

१२ ऑगस्टला भिलवडीत रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार

 १२ ऑगस्टला भिलवडीत रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार 


संवाद न्यूज प्रतिनिधी भिलवडी:

 संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख संयोजक प्रतीक संग्राम पाटील यांनी दिली आहे.

प्रथम क्रमांकासाठी 15000, द्वितीय क्रमांकासाठी 10000, तिसऱ्या क्रमांकासाठी 7000 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5000 रुपये अशी बक्षीसे आहेत. विजेत्यांना भव्य आणि आकर्षक चषक दिले जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येक सहभागी संघांना मानधन, स्मृतीचिन्ह आणि चांदीची भेटवस्तू सुद्धा दिली जाणार आहे.संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत असून कृष्णाघाटावर महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

या होड्यांच्या स्पर्धेसाठी माजी मंत्री .डॉ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत.मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ठीक 4 वाजता या स्पर्धा सुरू होणार असून भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू-भगिनींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी कृष्णा घाटावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

To Top